Chakan News : शेलपिंपळगाव, गडद व खालुंब्रेतील अवैध दारू धंद्यांवर कारवाई

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव, गडद व खालुंब्रे या तीन गावात अवैधरित्या सुरू असलेल्या दारू धंद्यांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यात पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चाकण पोलिसांनी पहिली कारवाई 30 जुलैला दुपारी एचपी चौक खालुंब्रे येथील हॉटेल तुळजाभवानीमध्ये केली. सत्यपाल किशोर बोरकर (वय 38, रा. खालुंब्रे, ता. खेड) याच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी हॉटेलमधून 6 हजार 980 रुपयांची विदेशी दारू जप्त केली.

दुसरी कारवाई 31 जुलैला दुपारी खेड तालुक्यातील गडद गावच्या हद्दीत केली. त्यात 7 हजार 135 रुपयांची देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी अक्षय ज्ञानेश्‍वर साबळे (रा. गडद, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याच दिवशी सायंकाळी चाकण पोलिसांनी केलेल्या तिसऱ्या कारवाईत शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील हॉटेल शिवराज चायनीजमध्ये छापा मारला. त्यात पोलिसांनी 4 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विशाल रामदास येनभर (वय 23, रा. शेलपिंपळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक सुरक्षा विभागाने गेल्या अनेक दिवसांपासून खेड तालुक्यात अवैध दारू धंद्यांवर कारवाया सुरु केल्याने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.