Chakan News : खेड तालुका प्रशासकीय विभाजन करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यातील औद्योगिक व नागरीकरण विचारात घेता नागरिकांना गतिमान प्रशासन लाभण्यासाठी तालुक्याचे प्रशासकीय विभाजन करून विद्यमान खेड तहसील (Chakan News) अंतर्गत खेड तालुक्यातील सुमारे 190 गावे आहेत. त्यांचे विभाजन करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

आदिवासी, दुष्काळी,बागायती, नागरी,औद्योगिक क्षेत्र खेड तहसील यांच्या कार्यक्षेत्रात येत असून. राजगुरूनगर येथे वाहतूक कोंडी,पार्किंग प्रश्न,अपघात यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. अनेकदा इच्छा असून तहसिलदार सर्वच कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून कामाचा निपटारा करू शकत नाही.(Chakan News ) मात्र प्रशासकीय विभाजन झाल्यास विद्यमान तहसिलदार यांचेकडे 117 गावे व अपर तहसिलदार चाकण पदनिर्मिती करून त्यांचेकडे 73 गावे व या 73 गावांबाबत अन्य भूमि अभिलेख व पुरवठा विभाग प्रशासकीय विभाजन करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.  यास चाकण पंचक्रोशीतील जनतेचा पाठिंबा मिळत आहे. सदर 73 गावे औद्योगिक व नागरी क्षेत्रात असून त्यांना चाकण शहर प्रशासकीय दृष्ट्या जवळ व सुलभ आहे.

हवेली तालुका प्रशासकीय विभाजन ज्या प्रमाणे झाले त्याच धर्तीवर खेड तालुक्यातील प्रशासकीय विभाजन करून अपर तहसिलदार,चाकण पदनिर्मिती करून त्यांच्याकडे चाकण, पिंपळगाव,आळंदी, पाईट सह राजगुरूनगर मंडल पैकी प्रशासकीय व भौगोलिक परिस्थिती विचार करता वाकी बुद्रूक सजा अंतर्गत एकूण 73 महसुली गावे वर्ग करून त्याक्षेत्रासाठी उपअधीक्षक,खेड व पुरवठा विभाग देखील विभाजन करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Maharashtra Political crises : पक्षचिन्हाबाबत आता आयोग निर्णय घेणार, शिंदे गटाला दिलासा

चाकण येथील मध्यवर्ती ठिकाणी गट नंबर-2493 या जागेत चाकण नगरपरिषद,अपर तहसिलदार,चाकण,अतिरिक्त मुख्यालय सहायक, भूमि अभिलेख,चाकण(खेड),पुरवठा विभाग जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे कार्यक्षेत्रातून वगळून अपर तहसिलदार,चाकण यांचेकडे वर्ग सर्व महसुली गावे पीएमआरडीए क्षेत्रात असून शहरी भागासाठी असलेल्या अन्न धान्य वितरण अधिकारी यांचे कार्यकक्षेत ही गावे समाविष्ट करावी व स्वतंत्र परिमंडळ अधिकारी ( नायब तहसीलदार संवर्ग) हे पद निर्माण करावे,दुय्यम निबंधक खेड २(चाकण),पोस्ट ऑफिस,(Chakan News) महावितरण, पोलीस स्टेशन, चाकण ही कार्यालय एकाच जागी घेवून प्रशासकीय इमारत बांधकाम होवू शकते, असे खेड बाजार समितीचे माजी संचालक राम गोरे , जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते ॲड. निलेश कड पाटील, चाकण शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, चाकण सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पठारे, उपाध्यक्ष दत्ता गोरे, वाकी खु. सोसायटीचे अध्यक्ष नितीन जाधव आदींनी सांगितले आहे.

अशी आहे मागणी :
महसुली गावे अपर तहसिलदार,चाकण यांचे कार्यक्षेत्रात देण्याची मागणी करण्यात येत असून
चाकण मंडल, 1) चाकण 2) मेदनकरवाडी 3) कडाचीवाडी 4) नानेकरवाडी 5) खराबवाडी 6) वाकी खुर्द 7) रोहकल 8) बिरदवडी 9) आंबेठाण 10) वराळे 11) पिंपरी खुर्द 12) गोनवडी 13) महाळुंगे 14) सावरदरी  15) वासुली 16) शिंदे 17) येलवडी 18) सांगुर्डी 19) खालुंब्रे 20) कान्हेवाडी त चाकण 21)  कोरेगाव खुर्द 22) भांबोली.

पाईट मंडल :
1) पाईट 2) रौधंळवाडी 3) अहिरे 4) पराले 5) तोरणे बु 6) टेकवडी 7) अनावळे 8) हेद्रुज 9) कासरी 10) पाळु 11) आडगाव 12) सुपे 13) वाघु 14)कुंजविहिरे 15) आसखेड खु. 16) शेलु 17) वाकी त वाडा  18) शिवे 19) वहागाव 20) देशमुखवाडी 21) कोळीये 22) गडद 23) वेल्हावळे

पिंपळगाव तर्फे खेड मंडल :
1) बहुळ 2) साबळेवाडी 3) चिंचोशी 4) कोयाळी त. चाकण
5) वडगाव घेनंद 6) काळूस
7) दावडी 8) पिंपळगाव तर्फे खेड 9) भोसे 10) रासे 11) शेलगाव 12) सिध्देगव्हाण

आळंदी मंडल :
१)आळंदी २)निघोजे ३)कुरुळी ४)मोई ५)चिंबळी ६)केळगाव ७)सोळू ८) चऱ्होली खु ९)धानोरे १०)मरकळ ११)पिंपळगाव त चाकण १२)गोलेगाव.

राजगुरूनगर मंडल पैकी वाकी बुद्रूक सजा :
१) वाकी बुद्रूक २)संतोषनगर ३) पिंपरी बुद्रूक ४) खरपुडी खुर्द.
अशी एकूण ७३ महसुली गावे आहेत.

प्रशासकीय विभाजन गरजेचे : ॲड. निलेश कड पाटील  
खेड तालुक्यातील प्रशासन गतिमान व लोकाभिमुख करण्यासाठी तालुक्याचे प्रशासकीय विभाजन आवश्यक व जनतेची निकड आहे. विभाजन झाले  तरच तालुक्यातील जनतेला न्याय भेटेल असे श्री गजानन महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते ॲड.निलेश कड पाटील यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.