Chakan News : वासुली गावातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था

एमपीसी न्यूज – चाकण एमआयडीसी, फेज- दोन, वासुली गावातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कंपनीत कामाला जाणारे अनेक कर्मचारी या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करतात. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

चाकण तळेगाव रस्त्यावर एचपी चौक, महिंद्रा सर्कल, खालुंब्रे गाव, तळवडे ब्रिज, चिखली या भागात कायम गर्दी व वाहतूक कोंडी होत असल्याने अनेक प्रवासी वासुली एनडीआरएफ गेट जवळील या रस्त्याचा वापर करतात. वाहतूक कोंडी होत नाही शिवाय वेळेची बचत होते. मात्र, दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे व दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीत जाणारे अनेक कर्मचारी या रस्त्याचा दररोज वापर करतात. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी कर्मचारी करत आहेत.

‘मी व इतर अनेक कामगार चाकण एमआयडीसी, फेज- दोन येथे खाजगी कंपनी काम करतो. पिंपरी-चिंचवड ते चाकण रोज ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करतो. जीई कंपनी ते सुदुंबरे गाव सिद्धांत कॉलेज गेट पर्यंत या रस्त्याची दुरावस्था झाली असून, तात्काळ याची दुरुस्ती केली जावी’, अशी मागणी प्रसाद ब्रह्मे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.