Chakan News : ब्रिटीशकालीन पूल झालाय धोकादायक…

एमपीसी न्यूज – तळेगाव-चाकण मार्गावरील सुदुंबरेच्या सुधा नदीवरच्या सुमारे 100 वर्ष जुना ब्रिटिशकालीन अरुंद दगडी पूलावरुन रोज हजारो अवजड वाहनांची एकेरी वाहतूक चालूच आहे.

ऐन वळणावरील सुधा पुलाला तीव्र वळण असून येथे अनेक अपघात झालेले आहेत. खेड व मावळ तालुक्याच्या सीमेवर सुधा नदीवरील या जुन्या पुलाला दुसरा समांतर पूल झाला असला तरी एकेरी वाहतुकीसाठी या ब्रिटीश कालीन पुलाचा वापर चालू असल्याने धोका कायम आहे.

याबाबत प्रशासन काही उपाययोजना करणार का? असा प्रश्न स्थानिक नागरिक व वाहन चालक विचारीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.