Chakan News : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची चाकण येथे निदर्शने

एमपीसीन्यूज : इंधन दरवाढीचा निषेध करीत खेड तालुका काँग्रेसतर्फे चाकणमध्ये हातगाडीवरून दुचाकीची आणि गॅस सिलेंडरची मिरवणूक काढून अनोखे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्राच्या भूमिकेवर टीका करत जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली.

खेड तालुका व चाकण शहर काँग्रेस, पुणे जिल्हा किसान कॉंग्रेस व महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस, किसान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे, अल्पसंख्याक सेलचे जमीर काझी, भास्कर तुळवे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

इंधन दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारचा निषेध म्हणून दुचाकीची व गॅस सिलेंडरची हातगाडीवरून मिरवणूक देखील काढण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे बाळासाहेब गायकवाड, अतिश मांजरे, वंदना सातपुते आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. केंद्राने तातडीने इंधन दरवाढ मागे न घेतल्यास शेणाच्या गोवऱ्या कुरिअरने दिल्लीला पाठविण्यात येणार असल्याचे कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ते ॲड. निलेश कड यांनी सांगितले.

यावेळी चाकण पोलिसांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. इंधन दरवाढीच्या विरोधात सध्या काँग्रेसतर्फे आणखी तीव्र आंदोलने करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष विजय डोळस यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.