Chakan News : राहुल गांधींवरील खासदार अपात्रता कारवाईच्या निषेधार्थ कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली निदर्शने

एमपीसी न्यूज – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वरील खासदार अपात्रता कारवाईच्या निषेधार्थ (Chakan News) काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. चाकण ( ता.खेड ) येथे शनिवारी ( दि. 25)  रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने करून केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीने चाकण मधील माणिक चौक परिसर दणाणून गेला.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जमीर काझी, वंदना सातपुते, सतीश राक्षे, निलेश कड, चंद्रकांत गोरे, गीताबाई मांडेकर, आनंद गायकवाड, अमोल दौंडकर, गणेश शहाणे, अमोल जाधव, मयूर आगरकर, निखील थिगळे, सुनील मिंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

Pune Crime News : पुण्यात खंडणीखोर गुंड टोळीवर ‘मोक्का’

सायंकाळी चाकण मधील माणिक चौक भागात चाकण आणि खेड तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संखेने एकत्र जमले. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्यने खेड तालुका व शहर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. कुठलाही अनुचित (Chakan News) प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील यावेळी तैनात करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.