Chakan crime News : गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजारांची लाच मागणाऱ्या ‘पीएसआय’वर गुन्हा

एमपीसी न्यूज – म्हाळुंगे पोलिस ठाण्यात दाखल चौकशी अर्जातील तक्रारदार यांच्याकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजारांची लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

राहुल शालिग्राम भदाणे, असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे पोलिस ठाण्यात दाखल पैशासंबधित चौकशीमध्ये तक्रारदार यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक राहुल भदाणे यांनी तक्रारदार यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची लाच मागितली.

त्यावर तक्रारदार यांनी संबंधित माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाला दिली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून राहुल भदाणे यांच्यावर कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटचे पोलिस निरीक्षक ज्योती पाटील, पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पोलिस काॅन्सटेबल किरण चिमटे, पोलिस काॅन्सटेबल आंबेकर व पोलिस नाईक इंगुळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.