Chakan News : केहिन फाय एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी दत्तात्रय गायकवाड

एमपीसीन्यूज : चाकण – महाळुंगे औद्योगिक वसाहतीमधील केहिन फाय एम्प्लॉईज युनियनच्या त्रेैवार्षिक निवडणुकीमध्ये ‘सत्यमेव जयते’ पॅनलचे 9 पैकी 8 सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. यामध्ये केहिन फाय एम्प्लाइज युनियनचे पहिले अध्यक्ष दत्तात्रय संभाजी गायकवाड यांची तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकाच्या मताधिक्क्याने निवड झाली

चाकण – महाळुंगे औद्योगिक वसाहतीमधील केहिन फाय एम्प्लॉईज युनियनच्या त्रेैवार्षिक निवडणुकीमध्ये ‘सत्यमेव जयते’ पॅनलचे 9 पैकी 8 सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

यामध्ये केहिन फाय एम्प्लाइज युनियनचे पहिले अध्यक्ष दत्तात्रय संभाजी गायकवाड यांची तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकाच्या मताधिक्क्याने निवड झाली आहे. ही निवडणूक सन 2020 ते 2023 या तीन वर्षासाठी झाली.

या निवडणुकीमध्ये कंपनीमधील 382 कामगारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये विजयी झालेले उमेदवार यांची नावे व त्यांस मिळालेली मते पुढील प्रमाणे.
1) दत्तात्रय संभाजी गायकवाड – 290 मते 2) प्रदीप बोरुडे – 254, 3) शंकर गडदे – 253, 4) मोहन राऊत- 237, 5) हनुमंत ठाकरे – 228, 6) तुकाराम आवटे- 220, 7) तुकाराम काळे -213, 8) विजय महाळुंगकर- 208, 9) जीवन येळवंडे – 205 याप्रमाणे मताधिक्‍य मिळवून कामगार प्रतिनिधी विजयी झालेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.