Chakan News: भोसे गावातील मिटकरी बाबा मठातील सेवेकरी दिगंबर ब्रह्मे यांचे निधन

0

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील भोसे गावातील मिटकरी बाबा मठातील सेवेकरी दिगंबर शंकर ब्रह्मे (वय 75) यांचे काल (रविवारी) दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्याच्यामागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा दोन जावई, चार नातू व पाच पणतू असा परिवार आहे. एमपीसी न्यूजचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे यांचे ते सासरे होत.

दिगंबर शंकर ब्रह्मे हे मूळ भोसे गावातील (ता. खेड, जि. पुणे) स्थानिक रहिवासी होते. ते 40 वर्षे पोस्ट खात्यात पोस्टमन या पदावर कार्यरत होते. त्याबरोबरच धार्मिक कार्याची विशेष आवड असल्यामुळे पोस्टसेवेत आसताना व सेवानिवृत्त झाल्यावर ही ते पंचक्रोशीत पौरोहित्याचे कार्य करत असत.

मनमिळाऊ स्वभाव व लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे अशा स्वभावामुळे गावकऱ्यामध्ये त्यांना विशेष आदराचे स्थान होते. दिगंबर ब्रह्मे हे भोसेगावातील प्रसिद्ध मिटकरी बाबांच्या मठात सेवेकरी म्हणून जबाबदारी सांभाळत होते. मठात होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांत मठाच्या संस्थापकांकडून ते उत्तम प्रकारे कार्यनियोजन करत असत.

त्यांच्या निधनामुळे भोसेगावावर शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III