Chakan News : चाकण परिसरातील अतिक्रमणे हटवली; चाकण पालिका , मेदनकरवाडी व नाणेकरवाडी ग्रा.पं.ची संयुक्त कारवाई

एमपीसी न्यूज – चाकण नगरपरिषद, मेदनकरवाडी आणि नाणेकरवाडी ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे बुधवारी (दि.8) अतिक्रमणांवर कारवाई केली. चाकण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तळेगाव चौक ते मुटकेवाडी, बालाजीनगर ते जुना पुणे नाशिक मार्ग ते माणिक चौकासह रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे करून, बेकायदेशीर व्यवसायिक हातगाड्या, पथारी विक्रेत्यांवर धडक कारवाई केली.

चाकण शहरालगतच्या मेदनकरवाडी आणि नाणेकरवाडी हद्दीतील माणिक चौक,तळेगाव चौक, मुटकेवाडी, बालाजीनगर ते जुना पुणे नाशिक रस्त्याच्या दुतर्फा पथारीवाले,हातगाडीवाले व्यवसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमणे करून दुकाने थाटली होती. यामुळे सतत वाहतूक कोंडी होत होती.यामुळे चाकण नगरपरिषद,नाणेकरवाडी ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे कारवाई करून वाहतुकीला अडथळा ठरणारी दुकाने हटवल्याने चौक काही प्रमाणात मोकळे झाले आहेत.

चाकण शहरात लगतच्या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण करून पान टपऱ्या, पथारी व्यवसायिक आणि हातगाडीवाल्यानी ठाण मांडल्याने सतत वाहतूक कोंडी होत आहे. चाकण एसटी बस स्थानिकाला तर बेकायदेशीर व्यवसायिकांचा अक्षरशः वेढा पडला आहे.यामुळे अनेकदा एसटी बस स्थानकात न येताच महामार्गावरून परस्पर जात आहे.

दरम्यान ही कारवाई गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढील पंधरा दिवस सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.