Chakan News: बंद घरातून गॅस सिलिंडर चोरीला

रविवारी सायंकाळी सात ते सोमवारी सकाळी सात या कालावधीत फिर्यादी यांना रात्रपाळी होती. त्यासाठी फिर्यादी फुले रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या घराला कुलूप लाऊन कामाला गेले.

एमपीसी न्यूज – कुलूप लाऊन बंद असलेल्या घरातून अज्ञात चोरट्यांनी गॅस सिलिंडर आणि गॅस शेगडी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि.10) सकाळी पावणे सात वाजता नाणेकरवाडी येथे उघडकीस आला.

गजानन सोपान फुले (वय 30, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सात ते सोमवारी सकाळी सात या कालावधीत फिर्यादी यांना रात्रपाळी होती. त्यासाठी फिर्यादी फुले रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या घराला कुलूप लाऊन कामाला गेले. सोमवारी सकाळी पावणेसात वाजता ते घरी आले असता त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडलेल्या अवस्थेत होता.

फुले यांनी घरात जाऊन बघितले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून 500 रुपये किमतीची गॅस सिलिंडरची टाकी आणि गॅस शेगडी चोरून नेल्याचे उघडकीस आले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.