सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Chakan News: चाकण मध्ये आझादी गौरव पदयात्रेचे स्वागत

एमपीसी न्यूज: यावर्षीचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन हा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन आहे. याचे औचित्य साधून पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली आहे.(Chakan News) चाकण येथे मंगळवारी (दि. 9) या पदयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

संपूर्ण चाकण शहरातून पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, देविदास भन्साळी , उत्कर्षा रुपवते, दादुभाई खान, तालुकाध्यक्ष विजय डोळस, अॅड. निलेश कड, बाळासाहेब गायकवाड, जमीर काझी, चंद्रकांत गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.(Chakan News) आ. संजय जगताप यांनी सांगितले की, देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्ह्यात ‘आझादी गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे. ही यात्रा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. या पदयात्रेद्वारे काँग्रेसची विचारधारा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवली जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यात ज्या कुटुंबांचा सहभाग होता, त्यांचा गावोगावी सन्मान करण्यात येत आहे.

Amit Thackeray : पक्षबांधणीसाठी अमित ठाकरे मैदानात; 12 पासून पुणे दौरा

रविवारी 14 ऑगस्ट रोजी पुण्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचा समारोप होणार आहे. दरम्यान यावेळी स्वातंत्र्य सैनिक व जेष्ठ कार्यकर्ते रंगुबाई गोरे, सुन्नापा सिकीलकर, गोपाळराव जगनाडे यांचा सन्मान करण्यात आला.

 

 

spot_img
Latest news
Related news