Chakan News : चाकण मध्ये कांद्याची उच्चांकी आवक

एमपीसी न्यूज-खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले ( Chakan News ) मार्केट मध्ये शनिवारी ( दि. 25मार्च) कांद्याची उच्चांकी 36 हजार पिशवी म्हणजे 18 हजार क्विंटल आवक झाली. यंदाच्या हंगामातील ही उच्चांकी आवक आहे. कांद्याला 800 ते 1211 रुपये एवढा प्रतीक्विंटलला भाव मिळाला.

 

 

Chakan News : राहुल गांधींवरील खासदार अपात्रता कारवाईच्या निषेधार्थ कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली निदर्शने

 

कांद्याच्या दरात यंदा अपेक्षित वाढ होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या बाबत व्यापारी आणि कांदा निर्यातदार कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या मते राज्यासह देशांतर्गत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच गुजरातमध्ये गेल्या वर्षापेक्षा लाल कांद्याचे उत्पादन अधिक झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीत देशांतर्गत घट झाली आहे.

त्याचाही थेट परिणाम बाजारभाव घसरणीवर होत आहे. यामुळे कांद्याचे दर यंदा खालीच राहिलेले आहेत. खेड तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. खेड बाजार समितीत कांद्याची मोठी आवक सुरु झाल्यामुळे भावात घसरण झाली आहे.
दरम्यान चाकण मध्ये बटाट्याची 3000 पिशवी आवक होऊन  800 ते 1300 रुपये एवढा भाव मिळाला. नवीन ( Chakan News ) बटाटा  गावरान बटाट्याला 800 ते 1100 रुपये भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.