Chakan News: पी के शैक्षणिक संकुलामध्ये स्वातंत्र्य दिन साधेपणाने साजरा

प्रताप खांडेभराड व नंदा खांडेभराड यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या ऑनलाइन पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

एमपीसी न्यूज- येथील पी के टेक्निकल कॅम्पसमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे फिजिकल डिस्टन्स पाळून पी के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रताप खांडेभराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी संचालक डॉ. संजय सिंग, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. रोहिदास भोर, इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सई तिकोने, एम. आर स्कूलच्या मुख्याध्यापिका गौरी वाटेकर, पॉलिटेक्निकचे प्रा. वैभव भोंग, अर्थ विभागाचे संतोष रिठे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रताप खांडेभराड व नंदा खांडेभराड यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या ऑनलाइन पद्धतीने शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अविनाश हांडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.