Chakan News : कळमोडी धरण 100 टक्के भरले; सांडव्यावरून पाणी वाहू लागले

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कळमोडी धरण पुर्ण क्षमतेने भरून, मध्यरात्री सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

धरणाच्या सांडव्यावरून गुरुवार (दि. 22 जुलै) पहाटे पासून आरळा नदी पात्रात तीन हजार क्युसेक्स वेगाने पाणी पडत आहे. हे पाणी चासकमान धरणाला जावून मिळत असल्यामुळे चासकमान धरणाच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होणार आहे. आरळा नदी काठी असलेल्या नागरिकांना जलसंपदा विभागामार्फत खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पावसाने दमदार कमबॅक केल्याने आणि धरण साखळीत संततधार सुरु असल्याने धरण साठ्यात मोठी वाढ होत आहे.

कळमोडी धरण भरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाची संततधार अशीच सुरु राहिल्यास चासकमान धरण देखील भरण्याची अपेक्षा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.