Chakan News: डंपरची पीएमपी बसला धडक; सुदैवाने दुर्घटना टळली

डंपरने बसला धडक दिली. यामध्ये बसचा पत्रा दबला गेल्याने पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने बसमधील कोणत्याही प्रवाशाला काही झाले नाही.

एमपीसी न्यूज – विरुद्ध दिशेने आलेल्या डंपरने पीएमपी बसला धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, पीएमपी बसचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि.11) सायंकाळी पावणे सात वाजता चाकण ते भोसरी या मार्गावर कुरुळी फाटा येथे घडली.

संदीप अंबऋषी धस (वय 34, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी डंपर (एमएच 14 सीपी 7245) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धस हे पीएमपी बस चालक आहेत. मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजता बस (एमएच 12 आरएम 8849) घेऊन राजगुरुनगर येथून वायसीएम येथे घेऊन जात होते. चाकणकडून भोसरीकडे जाणा-या रस्त्यावर कुरुळी फाटा येथे विरुद्ध दिशेने डंपर आला.

डंपरने बसला धडक दिली. यामध्ये बसचा पत्रा दबला गेल्याने पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने बसमधील कोणत्याही प्रवाशाला काही झाले नाही. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.