Chakan News : पोदार इंटरनॅशनल स्कूल चाकण विज्ञान दिवस उत्साहात साजरा 

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध वैज्ञानिक चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या (Chakan News) जन्मदिवसाचे औचित्य साधून पोदार इंटरनॅशनल स्कूल आंबेठाण चाकण या शाळेत विज्ञान दिवस उत्साहात साजरा  केला गेला .इयत्ता तिसरी ते आठवी च्या  विद्यार्थ्यांनी विज्ञानातील  विविध शोधाच्या प्रतिकुर्ती ( मॉडेल ) तयार केल्या होत्या . या विज्ञान प्रदर्शनी मध्ये अंदाजे 1000 प्रतिकृती होत्या .

Kalewadi News : जाब विचारला म्हणून बाप-लेकावर कोयत्याने वार

त्यातील थ्री . डी . प्रिंटर  प्रतिकुर्ती ,सोलर पॅनल प्रतिकृती ड्रोन प्रतिकृती या प्रदर्शनीचे मुख्य आकर्षक ठरल्या.  प्रदर्शनीचे उद्घाटन प्राचार्या  सिमरन कौर यांच्या हस्ते झाले . या प्रसंगी विद्यार्थ्यांना  संबोधित करताना  प्राचार्या म्हणाल्या कि विद्यार्थ्यांनी डॉ . सी . वी . रमण  व डॉ . ए . पी . जे अब्दुल कलाम यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगावा . संशोधन कार्यात  आपले 100% योगदान दयावे . वेगवेगळ्या गोष्टींवर  संशोधन करून भारत देशाच्या राष्ट्रीय प्रगतीला हातभार लावावा .

 

विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रतिकृती चे प्राचार्यांनी कौतुक केले तसेच प्रोत्साहनवर गौरवोद्गार काढले .प्रतिकृती बनविण्यासाठी शाळेतील  विज्ञान शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन व मदत केली . विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतला .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.