Chakan News : अत्याधुनिक, ब्रॅण्ड न्यू ‘स्कॉडा कुशक’च्या निर्मितीला पुण्यात सुरुवात

एमपीसी न्यूज – स्कॉडा ऑटो फोक्सवैगन इंडिया प्राइवेट लिमिटेड या चाकण येथील प्लान्ट मध्ये अत्याधुनिक, ब्रॅण्ड न्यू ‘स्कॉडा कुशक’च्या निर्मितीचा शुभारंभ करण्यात आला आहे. स्कॉडा ऑटोच्या वतीने याबाबत अधिकृत घोषणा केली. येत्या जुलैपासून ग्राहकांसाठी ही कार उपलब्ध होणार असल्याचे स्कॉडा ऑटोच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

आकर्षक डिझाईन, आरामदायक सुविधा, सुरक्षा आणि आधुनिक इनफोटेनमेंट सिस्टम ‘स्कॉडा कुशक’ला वेगळं बनवतात. स्थानिक तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या दमदार व अत्याधिक कुशल TSI इंजिनसह कुशक उपलब्ध आहे‌. नवीन स्कॉडा कुशक, मॉड्यूलर MQB-A0 यांचे वेरिएंट असलेल्या MQB A0-IN या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ज्याची निर्मिती भारतीय आणि जागतिक बाजारपेठेचा विचार करून करण्यात आली आहे.

या प्रसंगी बोलताना स्कॉडा ऑटो फोक्सवैगन इंडिया प्राइवेट लिमिटेडचे मैनेजिंग डायरेक्टर गुरप्रताप बोपाराय म्हणाले, ‘इंडिया 2.0 योजने अंतर्गत कारचे उत्पादन सुरू करणे ही मोठी गोष्ट आहे. जगातील आमच्या सर्व टिम मधील कामगार आणि तंत्रज्ञ यांच्या सहकार्याचे हे प्रतिक असून या कारला 95 टक्के लोकल करण्यात आम्हाला यश आले असल्याचे बोपाराय म्हणाले.

ग्राहकांना एक अशी SUV सादर करण्यासाठी आम्ही तयार आहोत जिचे मनमोहक डिझाइन, निर्माण गुणवत्ता, उत्कृष्ट सुरक्षा आणि अशी बरीच ‘सिंपली क्लेवर सॉल्यूशंस’ इतर वाहनांच्या तुलनेत वेगळी आहेत असे मत बोपाराय यांनी मांडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.