Chakan News : महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये टोमॅटो, कांदा व वाटाण्याची विक्रमी आवक

एमपीसी न्यूज-खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Chakan News) चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये टोमॅटो, कांदा व वाटाण्याची विक्रमी आवक झाली. फळभाज्यांच्या बाजारात बटाटा व लसणाचे भाव तेजीत राहिले आहेत. कांद्याची उच्चांकी आवक होऊनही भाव स्थिर राहिले.

 

जळगाव भुईमुग शेंगा व बंदुक भुईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची भरपूर आवक झाली. जनावरांच्या बाजारात शेळ्या – मेंढ्यांच्या संख्येत घट होवून त्यांचे भाव स्थिर राहिले . जर्शी गाई, बैल व म्हशींच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल 5 कोटी 20 लाख रुपये झाली.

 

 

Pimpri News : पवना बँकेच्या निवडणुकीतून भाऊसाहेब भोईर यांची माघार

 

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 18,000 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 7 हजार क्विंटलने वाढल्याने कांद्याचा कमाल भाव 1,300 रुपयावर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 850 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 900 क्विंटलने घटल्याने भावात 100 रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 1400 रुपयांवरून 1,500  रुपयांवर पोहोचला.  लसणाची एकूण आवक 40 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून भावात 1,000  रुपयांची वाढ झाली. लसणाचा कमाल भाव 7 हजार रुपयांवरून 8 हजार रुपयांवर पोहोचला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक 395 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या (Chakan News) तुलनेत ही आवक स्थिर राहिली. हिरव्या मिरचीला 4 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

 

 

 शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –

कांदा – एकूण आवक – 18,000  क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,300  रुपये, भाव क्रमांक 2. 1,100  रुपये, भाव क्रमांक 3. 800 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 850  क्विंटल. भाव क्रमांक1. 1, 500 रुपये, भाव क्रमांक2. 1,250 रुपये, भाव क्रमांक 3. 1,000 रुपये.

 

 फळभाज्या –
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –
टोमॅटो – 330 क्विंटल ( १,००० ते २,००० रू. ), कोबी – 215 क्विंटल ( 500 to 700), , फ्लॉवर – 234 क्विंटल (Rs. 1,000 to 2,000), , वांगी – 102  क्विंटल (Rs. 1 ,000 to Rs.2,000), , भेंडी – 60  क्विंटल ( 3,500ते 4,500 रु.), दोडका – 63  क्विंटल ( 3,000 ते 4,000 रु.), कारली – 69  क्विंटल ( 2,000 ते 3,000रु.), दुधीभोपळा – 62 क्विंटल ( 1,000 ते 2,000 रु.), काकडी – 74 क्विंटल ( 2,000 ते 3,000 रु.), फरशी – 69  क्विंटल ( 2,000 ते 3 ,000रु.), वालवड – 63   क्विंटल ( 1,500 ते 2,500 रुपये), गवार – 14 क्विंटल (7,000 ते 9,000 रू.), ढोबळी मिरची – 136  क्विंटल ( 2 ,000 ते 3,000  रु.), चवळी – 24  क्विंटल ( 2,000 ते 3,000रुपये.), वाटाणा – 180 क्विंटल ( 5,500 ते 6,500 रु.), शेवगा – 38  क्विंटल ( 3,000 ते 5.000  रुपये ), गाजर – 230  क्विंटल (1,500  ते 2,000 रु.).

 पालेभाज्या –  

चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे –
मेथी – एकूण 19 हजार 640 जुड्या ( 600 ते 1,000 रुपये,), कोथिंबीर – एकूण 24  हजार 600  जुड्या ( 300  ते 600 रुपये,), शेपू – एकूण 2 हजार 900 जुड्या ( 500  ते 1,000 रुपये ), पालक – एकूण 3 हजार 800 जुड्या (400 ते 600 रुपये),.

 जनावरे –

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 55 जर्शी गाईपैकी 38 गाईची विक्री झाली.( 15,000 ते 55,000 रुपये,), 167 बैलांपैकी 115 बैलांची विक्री झाली ( 15,000 ते 45,000 रुपये ), चाकणला विकीसाठी आलेल्या 182 म्हैशीपैकी 162 म्हशींची विक्री झाली. म्हशीला 30 हजार ते 80  हजार रुपये भाव मिळाला. शेळ्या – मेंढ्यांच्या संख्येत घट झाली असून, विक्रीसाठी आलेल्या 8,630  शेळ्यापैकी 8,130  शेळ्यांची विक्री झाली. शेळ्यांना 2 हजार रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंत भाव (Chakan News) मिळाला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.