Chakan News : सुरक्षित ठिकाणी गाडी लावण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज – दारूच्या दुकानासमोर दुचाकी लावली तर ती सुरक्षित राहील, असे सांगून दुचाकीस्वाराकडून त्याच्या दुचाकीची चावी घेतली आणि अनोळखी व्यक्ती पसार झाला. याप्रकरणी विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते चार वाजताच्या सुमारास नाणेकरवाडी येथे घडला.

मारुती लक्ष्मण धांडे (वय 33, रा. वाघेवस्ती, चाकण. मूळ रा. अहमदनगर) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 5) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 406 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना ‘तुझी गाडी देशी दारूच्या दुकानासमोर लावतो. येथून गाडी चोरीला जाणार नाही’ असे सांगितले. फिर्यादी यांच्याकडून दुचाकीची चावी घेतली आणि अनोळखी व्यक्ती दुचाकी घेऊन पसार झाला. त्याने सांगितलेल्या ठिकाणी दुचाकी न लावता फिर्यादी यांचा विश्वासघात केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.