Chakan News: घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 18 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता घडली असून याबाबत 23 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महेंद्र बहिराराम चौधरी (वय 24, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांनी त्यांची 16 हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर दुचाकी (एम एच 12 / के डब्ल्यू 3756) त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 18 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता उघडकीस आला. त्यानंतर चौधरी यांनी आजूबाजूला दुचाकीचा शोध घेतला. मात्र त्यांची दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी 23 ऑगस्ट रोजी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.