Chakan News: फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चोरी

Chakan News: Theft in the office of a finance company चोरट्यांनी कार्यालयातून 25 हजार 550 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

एमपीसी न्यूज – चाकण येथे एचडीबी फायनान्शियल सर्विसेस या कंपनीच्या कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी कार्यालयातून 25 हजार 550 रुपयांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना मंगळवारी (दि.18) सकाळी उघडकीस आली.

प्रफुल्ल सुरेश जागरवाल (वय 39, रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लि. या कंपनीच्या कार्यालयात सोमवारी (दि.17) रात्री आठ ते मंगळवारी (दि.18) सकाळी साडेनऊ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी कार्यालयातून 25 हजार 550 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.