Chakan news : पत्ता सांगण्यासाठी धमकी देत मारहाण

एमपीसी न्यूज़ –  मित्राचा पत्ता सांग नाहीतर तुला (Chakan news)  मारून टाकतो  अशी धमकी देत एकाला मारहाण करण्याची घटना घडली. या मारहाणीत धीरज आढाव जखमी झाले आहे. हा प्रकार 29 मार्च रोजी चिखली येथील एकता हाउसिंग सोसायटी येथे घडला.

 

 

या प्रकरणी अमित अशोक चव्हाण (रा. वृंदावन हाउसिंग सोसाइटी, वय: 33) यांनी चिखली पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली असून आरोपी ओंकार ओव्हाळ व त्याचे मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Alandi News : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची भव्य शोभायात्रा

 

धीरज आढाव हे फिर्यादी अमित अशोक चव्हाण यांचे मित्र आहेत .धीरज आढाव हे एकता हाउसिंग सोसाइटी समोरून जात असताना आरोपींनी  आढाव यांच्या डोक्यावर, हाता-पायावर स्क्रूड्राइवर ने गंभीर मारहाण करत  फिर्यादी अमित अशोक चव्हाण याचा पत्ता सांग नाहीतर तुझा  मर्डर करू अशी धमकी दिली.

 

तसेच आढाव यांचे अपहरण करुन त्यांना  घेऊन जाऊ लागले तेव्हा भीतीने आढाव यांनी फिर्यादीचे  राहते घर दाखविले.त्यावेळी आरोपींनी  फिर्यादी यांच्या घरात घुसून कोयत्याने त्यांच्या गळ्यावर वार करत जीवघेणा हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत धीरज आढाव यांच्या डोक्याला लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

 

या  या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक विवेक कुमटकर (Chakan news) करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.