Chakan News : वीज पुरवठा खंडीत केल्याच्या रागातून महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला

एमपीसी न्यूज – थकीत वीज बिलामुळे वीज पुरवठा (Chakan News) खंडित केल्याच्या रागातून महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉड डोक्यात घालून गंभीर दुखापत करण्यात आल्याची धक्कदायक घटना घडली. काल (दि. 26 मार्च ) चाकणमधील साई साम्राज्य सोसायटीत हा प्रकार घडला.

 

PCMC : मुद्रांक शुल्क अधिभारातून महापालिकेला मिळणार 32 कोटी

 

मयूर चंद्रकांत चौधरी व प्रदीप शेवरे असे या मारहाणीत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांत मयूर चौधरी यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अक्षय चोरडिया, आकाश चोरडिया, पन्नालाल चोरडिया ( सर्व रा. साई साम्राज्य सोसायटी,चाकण ) व एक अनोळखी इसम अशा चार जणांवर सरकारी कामात अडथळा, गंभीर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मागील महिन्यात संबंधितांचा वीज पुरवठा खंडित केला होता. त्याच राग मनात धरून सदरची मारहाण केल्याचे चाकण पोलिसात देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चाकण पोलीस अधिक तपास (Chakan News) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.