Chakan News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 16) दुपारी साडेतीन ते पावणे चारच्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीत चाकण – तळवडे रोडवर घडली.

अनिल बबन लोहार (वय 47) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी विनोद मधुकर देसाई (वय 51, रा. वाकड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ चाकण येथील एका कंपनीत काम करत होता. ते सोमवारी दुपारी कंपनीतून कामावरून सुटले आणि दुचाकीवरून घरी जात होते. निघोजे गावच्या हद्दीत चाकण – तळवडे रोडवर त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. त्यात अनिल लोहार हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता तिथून पळून गेला. दरम्यान अनिल लोहार यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.