Chakan News : चाकणच्या कररचनेचे फेरसर्वेक्षण करू – मुख्यमंत्री शिंदे

एमपीसी न्यूज -चाकण पालिकेच्या वाढीव कररचनेबाबत (Chakan News ) फेरसर्वेक्षण करून त्याबाबत नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात येईल, त्याच प्रमाणे चाकण शहरासाठी नवी पाणीपुरवठा योजना आणि वाहतूक कोंडी यातून सुटका व्हावी यासाठी योग्य नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकणकर नागरिकांना दिले आहे.

 

 

Baner News : जलसंवर्धनाच्या क्षेत्रातील शाश्वत कार्यासाठी कौशल्याधारीत मनुष्यबळ गरजेचे – डॉ. नितीन करमाळकर

 

 

 

खेडचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे, त्यांचे बंधू नितीन गोरे यांच्यासह गोरे कुटुंबातील इतर सदस्य तसेच पुणे ग्रामीण पट्ट्यातील स्थानिक स्तरावरील अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.14) शिवसेना(शिंदे गट) पक्षात मुंबई जाहीर प्रवेश केला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. दिवंगत आमदार सुरेश गोरे यांना अपेक्षित असलेली विकासकामे खेड तालुक्यात करण्यात येतील , असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

 

यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,  जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर,शिवसेना जिल्हा संघटक अशोक भुजबळ, शिवसेना तालुका प्रमुख राजु जवळेकर,प्रकाश वाडेकर, ज्योती  आरगडे आदींसह पदाधिकारी मोठ्या संखेने (Chakan News ) उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.