Chakan News : गावी जाणा-या दाम्पत्याचा अपघात, ट्रकच्या चाकाखाली येऊन पत्नीचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – कात्रज येथून दुचाकीवरून आपल्या मूळगावी जाणा-या दाम्पत्याचा चाकण जवळ अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पत्नीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला आहे. पुणे – नाशिक महामार्गावर स्पाईसर चौक, निघोजे येथे शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

मनिषा मुळुक असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचा पती रमेश फकीर शेठ मुळुक (वय 45, रा. खेड) यांनी चाकण म्हाळुंगे चौकी याठिकाणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जीजे 17/ युयु 7972 या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या पत्नीसोबत दुचाकीवरून आपल्या मूळगावी जात होते. पुणे – नाशिक महामार्गावर स्पाईसर चौक, निघोजे येथे त्यांच्या दुचाकीला ट्रकने ठोकर दिली. यामुळे झालेल्या अपघातात फिर्यादी गंभीर जखमी झाले तर, त्यांच्या पत्नीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन पत्नीचा जागीच मृत्यू झाला. दाखल फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.