Chakan News: आडोशाला बसलेल्या महिलेचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू

अलका रामदास जाधव (वय 55, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार हनुमंत बांगर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमपीसी न्यूज – उभ्या असलेल्या कंटेनरच्या खाली आडोशाला बसलेल्या महिलेचा कंटेनरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.10) दुपारी चार वाजता भांबोली गावाच्या हद्दीत ओम वजन काट्याजवळ घडली. याबाबत बुधवारी (दि.12) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलका रामदास जाधव (वय 55, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार हनुमंत बांगर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर क्रमाक 4055 वरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 4055 या क्रमांकाचा कंटेनर भांबोली गावच्या हद्दीत ओम वजन काट्यासमोर कोनिंग कंपनीकडे जाणा-या रस्त्यावर उभा होता. त्यावेळी अलका जाधव या कंटेनरच्या आडोशाला बसल्या होत्या.

आरोपी कंटेनर चालकाने कंटेनरच्या खाली कोणी बसलेले आहे की नाही याची खात्री न करता कंटेनर चालू करून नेला. यामध्ये चिरडून अलका यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.