BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल; तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – नात्यातील तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तरुणीचे लग्न जमले असताना तिच्या सासरच्या मंडळींना अश्लील फोटो दाखवून लग्न मोडले. याबाबत एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना म्हाळुंगे येथील लॉजवर घडली.

दिनेश शिवाजी पारखी (रा. माण, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि पीडित तरुणी नात्यातील आहेत. 30 जुलै 2018 रोजी दिनेश हा पीडित तरुणीला म्हाळुंगे येथील एका लॉजवर घेऊन गेला. तिथे तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचे 30 ते 40 अश्लील फोटो काढले. हे फोटो त्याने मित्राच्या मोबाईलवर पाठवले. तसेच तरुणीचे लग्न जमल्यानंतर लॉजवर काढलेले अश्लील फोटो तरुणीच्या सासरकडच्या मंडळींच्या मोबाईलवर पाठवून तिचे लग्न मोडले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3