Chakan : विनापरवाना सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या सुरक्षा एजन्सी चालकावर गुन्हा

Offense against a security agency providing unlicensed security guards

एमपीसी न्यूज – खासगी सुरक्षा रक्षक पुरविण्याचा कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक पुरविल्याप्रकरणी एका सुरक्षा रक्षक एजन्सी चालविणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 9) सकाळी वाघजाई नगर येथील कंपन्यांमध्ये उघडकीस आली.

सचिन मारुती शीळवणे (वय 30, रा. वाघजाई नगर, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक एस. एम. मुळे यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 10) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन याच्याकडे खासगी सुरक्षा रक्षक एजन्सी चालविण्याचा कोणताही परवाना नाही.

तरी देखील त्याने वाघजाई नगर येथील सिद्धांत इंजिनिअरिंग, दीपलक्ष्मी एलएलपी हर्क्युलस इंजिनिअरिंग, भारत टेक्नोप्लास्ट या कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक पुरविले.

हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. त्यानंतर सचिन विरोधात भारतीय दंड विधान कलम 188, दि प्रायव्हेट सिक्युरिटी (रेग्युलेशन) अॅक्ट सण 2005 चे कलम 4 व 20 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.