Chakan : जुने वडाचे झाड कोसळल्यामुळे तळेगाव-चाकण रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज- तळेगाव-चाकण रस्त्यावर खालूम्ब्रे येथे जुने वडाचे झाड अचानक आज, बुधवारी पहाटे चारच्या सुमारास कोसळले. झाड पडून टेम्पोचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. याच मार्गावर इंदोरीजवळ तोलानी मरीटाईम इन्स्टिट्यूटजवळ मोठा कंटेनर बंद पडल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. त्यामुळे वडगाव ते म्हाळुंगे रस्ता जाम झाला आहे. या घटनेमुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांचे मोठे हाल झाले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.