Chakan : शेतीच्या वादातून एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – शेतीच्या जुन्या वादावरून एकावर कोयत्याने वार केले. तसेच शिवीगाळ करत दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 27) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.

दत्तात्रय तुळशीराम येळवंडे (रा. निघोजे गावठाण, ता. खेड) असे जखमीचे नाव आहे. त्यांचा भाऊ गोविंद तुळशीराम येळवंडे (वय 49) यांनी याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संकेत भगवान येळवंडे, स्वप्निल भगवान येळवंडे, मनीषा भगवान येळवंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे शेतीच्या जुन्या वादावरून भांडण सुरू होते. सोमवारी सायंकाळी आरोपींनी फिर्यादी गोविंद यांचे भाऊ दत्तात्रय यांच्या डोक्यात कोयत्याने मारून जखमी केले. तसेच आरोपी संकेत आणि मनीषा या दोघांनी फिर्यादी आणि त्यांची भावजय जयश्री यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादी यांना दमदाटी केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.