Chakan : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक; दोन किलो गांजा जप्त

One arrested for selling cannabis; Two kilos of cannabis seized

0

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून दोन किलो 63 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

लक्ष्मण निवृत्ती कुंभार (वय 32, रा. सातकरवाडी, ता. खेड. मूळ रा. पंकजनगर, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस नाईक नाथा रामकिसन केकाण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना माहिती मिळाली की, म्हाळुंगे येथे तळेगाव-चाकण रोडवर एचपी चौकात एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहे.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून लक्ष्मण कुंभार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन किलो 63 ग्राम वजनाचा 50 हजार रुपयांचा गांजा आढळून आला. त्याने हा गांजा विक्री करण्यासाठी आणला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

त्यानुसार लक्ष्मण याच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like