Chakan : दिड लाखांच्या गुटख्यासह एकाला अटक

एमपीसी न्यूज : चाकण येथील बिरदवडी (Chakan) येथून एकाला दिड लाख रुपायांच्या गुटख्यासह अटक केली आहे. हि कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि.24) केली आहे.
सवाराम रताराम चौधरी (वय 42 रा. चाकण) असे अटक आरोपीचे नाव असून याप्रकऱणी चाकण पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई रणधीर रमेश माने यांनी फिर्याद दिली आहे.
Maval HSC Result : बारावीच्या निकालात मावळचा शेवटून पहिला क्रमांक
पोलिसांनी आरोपीच्या गोडाऊनवर पोलिसानी छापा मारला आहे.येथे पोलिसांनी 1 लाख 53 हजारांचा विविध कंपनीचे गुटखा, सुगंधीत तंबाखू व मोबाईल जप्त केला आहे. आरोपीने बेकादेशीर रित्या विक्रीसाठी या गुठख्याची साठवणूक केली होती. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.