Chakan : दुचाकी स्लीप होऊन पडल्याने एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकी स्लीप होऊन पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गावर मेदनकरवाडी चाकण येथे घडला. याबाबत 14 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महादेव लक्ष्मण काळे (वय 45, रा. भावडी, ता. आंबेगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत दुचाकीस्वार निवृत्ती लक्ष्मण काळे (वय 39) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता निवृत्ती काळे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 / एचबी 5347) नाशिक-पुणे महामार्गावरून जात होते. ते मेदनकरवाडी येथे आले असता त्यांची दुचाकी घसरली आणि ते महामार्गावर पडले.

या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत दीड महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.