Chakan : विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – शाळेतून घरी जात असेलल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 11) दुपारी सव्वापाचच्या सुमारास म्हाळुंगे येथे घडली.

गणेश धर्माळे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 13 वर्षीय विद्यार्थिनीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित विद्यार्थीनी बुधवारी दुपारी सव्वापाचच्या सुमारास शाळेतून घरी निघाली. ती घरी जाण्यासाठी सिक्स सिटर रिक्षामध्ये बसली होती. यावेळी आरोपी देखील रिक्षात बसला. त्याने विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.

तसेच तिला मारहाण करून शिवीगाळ केली. ‘मी तुला सोडणार नाही’ अशी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.