Chakan : कुत्र्याला मारल्याच्या रागातून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – शेजारी राहणा-या दोन पाळीव कुत्र्यांची भांडणे लागली. ती सोडवण्यासाठी एकाने दोन्ही कुत्र्यांना लहान काठीने मारले. आपल्या कुत्र्याला मारले याचा राग मनात धरून दुस-या कुत्र्याच्या मालकाने कुत्र्याला काठीने मारणा-याला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 13) सकाळी सातच्या सुमारास मोहितेवाडी येथे घडली.

सुनील बबन मोहिते (वय 43, रा. मोहितेवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार खंडू विठ्ठल मोहिते (रा. मोहितेवाडी, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील आणि खंडू हे एकमेकांच्या शेजारी राहतात. दोघांनीही कुत्रे पाळले आहे. दोघांची कुत्री गुरुवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास भांडू लागली. यामुळे सुनील यांनी एका लहान काठीने दोन्ही कुत्र्यांना मारले आणि भांडण सोडवले. सुनील यांनी आपल्या कुत्र्याला मारले या रागातून खंडू याने सुनील यांच्या डोक्यात कठीण वस्तूने मारले. तसेच छातीवर, हनुवटीवर आणि बरगडीवर मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like