Chakan : किरकोळ कारणावरून एकाला मारहाण करून केले जखमी

एमपीसी न्यूज : किरकोळ कारणावरून (Chakan) एकाला मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. याबाबत शरद शिंगाडे  (वय 37 वर्षे, रा. राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुधाकर राठोड (रा. मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) या आरोपी विरोधात भादवि कलम 324, 323 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri-Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आज दोन आगीच्या घटना

फिर्यादी हे शोरूमला जात असताना सिक्युरिटी सुधाकर राठोड यांनी फिर्यादीला पाहून (Chakan) तू माझ्याकडे काय बघतोस? अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादीने त्यांना मी कुठे तुमच्याकडे पाहतो? असे सांगितले. आमच्या शोरूम मधून जायचे नाही असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. त्यावेळी फिर्यादीने सांगितले की मी रोजच जातो. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला हाताने मारहाण करून त्याच्या हातातील कटरने फिर्यादीचे नाकावर डाव्या बाजूस व डोक्यावर मारून दुखापत केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.