Chakan : रूमचा दरवाजा उघडून 12 हजारांचा ऐवज पळवला

opened the door of the room and stole Rs 12,000

एमपीसी न्यूज – अनोळखी चोरट्यांनी रूमचा दरवाजा उघडून वायर, इलेक्ट्रिक शेगडी, सिलिंग फॅन असा 12 हजार 300 रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 25) दुपारी पावणेपाच वाजता खेड तालुक्यातील शेलगाव येथे निर्मित सोलार कंपनी शेजारी घडली.

याप्रकरणी  सचिन पांडुरंग झरेकर (वय 32, रा. शेलगाव, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार  पोलिसांनी 30 ते 35 वयाच्या अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलगाव दत्तवाडी येथे निर्मिती सोलार प्रा. ली. या कंपनीच्या शेजारील रूमचा दरवाजा 30 ते 35 वयाच्या अनोळखी व्यक्तीने उघडला. चोरट्याने रूममधून पॉलिकॅप कंपनीची 200 मीटर वायर, इलेक्ट्रिक शेगडी, सिलिंग फॅन असा 12 हजार 300 रुपयांचा माल चोरून नेला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like