Chakan: चाकण येथील पी.के. इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसईचा दहावीचा निकाल 100 टक्के

Chakan: P.K. International School's CBSE X result is 100 percent याबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कराटे क्रीडा स्पर्धेत यश मिळवले.

एमपीसी न्यूज- चाकण येथील पी.के फाऊंडेशन संचलित पी.के इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसईची दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेने 100 टक्के निकालाची आपली परंपरा कायम राखली आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड व सचिव नंदा खांडेभराड यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

याबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कराटे क्रीडा स्पर्धेत यश मिळवले. भोसरी येथील प्रसिद्ध इंद्रायणी थडी उत्सव नृत्यस्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळविला आहे.

सर्व विद्यार्थ्यांना संस्था प्रतिनिधी निकिता खांडेभराड व प्राचार्या सई तिकोने, उपप्राचार्य प्रशांत बावधनकर आणि सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम पाच क्रमांक मिळविलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
प्रथम क्रमांक – यश नितीन देशपांडे: 89.20 टक्के
द्वितीय क्रमांक – साक्षी विनोद भिंगारदिवे: 85.20 टक्के
तृतीय क्रमांक – दुर्गेश भीमराव पाटील: 84.00 टक्के
चतुर्थ क्रमांक – धीरज प्रवीण चौधरीः 80.60 टक्के
पाचवा क्रमांक – तन्मय रामदास आंद्रे: 80.00 टक्के.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.