chakan : पी. के. ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

P. K. Junior college students succeed in class XII : यावर्षी देखील यशाची परंपरा कायम

एमपीसीन्यूज : चाकण येथील पी. के. फाऊंडेशन संचलित पी. के. कॉमर्स अँड सायन्स जुनियर कॉलेजने यावर्षी देखील यशाची परंपरा कायम ठेवली. यावर्षी 12 वी सायन्स विभागाचा निकाल 100 टक्के, तर कॉमर्स विभागाचा निकाल 99 टक्के लागल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड व सचिव नंदा खांडेभराड यांनी दिली.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य रोहिदास भोर व सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रथम पाच क्रमांक मिळविलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे-

सायन्स विभाग-

प्रथम -गोस्वामी पूनम बाबूलाल (87.69%), द्वितीय- पवार अश्विनी बाळू (76.92%), तृतीय-पठारे साक्षी सतीश (74.15%), चतुर्थ – गुजर किशोरी शिवाजी : (72.30%), पाचवा – परभाने कल्याणी सोपान (71.69%)

कॉमर्स विभाग-

प्रथम -आवटे कोमल सुरेश (79.69%), द्वितीय – मुऱ्हे गौरी संजय (78.92%), तृतीय -बिरदवडे निकिता आण्णा (78.38%), चतुर्थ – गाडे साक्षी भानुदास (77.38%), पाचवा – गरुड दिव्या सचिन (77.07%)

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पी.के.फाउंडेशनच्या सर्व शैक्षणिक शाखांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.