Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एकाला भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री सावरदरी येथील कमानीजवळ घडली.

बिमल अमर बैध (वय 32) असे अपघातात मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बिकास रामानंद दास (वय 36, रा. सावरदरी ता. खेड. मूळ रा. आसाम) यांनी म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास मयत बिमल हे सावरदरी येथील कमानीजवळ रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात बिमल हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती न देता अज्ञात वाहनचालक पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.