Chakan: अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Chakan: Pedestrian killed in unidentified vehicle collision भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गायकवाड हे गंभीर जखमी झाले.

0

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने पादचाऱ्याला जोरात धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात 15 जून रोजी सकाळी शिक्रापूर-चाकण रोडवर चाकण क्रिटिकेअर हॉस्पिटलजवळ झाला.

पंढरी सोपान गायकवाड (वय 55, रा. चाकण, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या पादचा-याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार एस बी सुपेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर-चाकण रोडवर क्रिटिकेअर हॉस्पिटलजवळ मृत पंढरी गायकवाड हे सकाळी दहाच्या सुमारास पायी चालत जात होते.

त्यावेळी भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गायकवाड हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. 17 जून रोजी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like