BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : खासगी बसच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी; चाकण पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला खासगी बसने धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात बुधवारी (दि. 4) सकाळी साडेआठच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर नाणेकरवाडी येथे झाला.

लक्ष्मीबाई मधुकर गौसटवार असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नील सुधाकर गौसटवार (वय 28, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मैत्रेय ट्रॅव्हलच्या बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास लक्ष्मीबाई पुणे-नाशिक महामार्गावरून नाणेकरवाडी येथे पायी चालत जात होत्या. लक्ष्मीबाई रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या मैत्रेय ट्रॅव्हल्सच्या एमएच 14 / डी ए 9895 या बसने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.