Chakan : पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुण ताब्यात ; देशी पिस्तुल व दोन काडतुसे हस्तगत

चाकण एमआयडीसी येथील कारवाई

एमपीसी न्यूज- बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुरुवारी (दि.28) भाम्बोली (ता. खेड) येथून एका 30 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

राम बबन लालगुडे (वय 30, रा. टाकवे , ता. मावळ जि.पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चाकण एमआयडीसी जवळच्या भागात एक तरुण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी गुरुवारी सापळा रचून राम याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली.

संबंधित तरुणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.