Chakan : भरदिवसा दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव चाकण पोलिसांनी उधळला; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – भरदिवसा कंपनीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव चाकण पोलिसांनी उधळून लावला. टोळीतील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी पावणेपाचच्या सुमारास खालूंब्रे गावाजवळ मेरियट हॉटेलसमोर घडली. चाकण पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

पांडुरंग किसन पडवळ (वय 29, रा. पडवळ वस्ती, शेलू चाकण), अबिद मोहम्मद शब्बीर हुसैन (वय 32, रा. पुरेना, तुलसीपूर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश), मकसूद बिसमिल्ला खान (वय 32, रा. घाटकोपर मुंबई. मूळ रा. तुलसीपूर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह त्यांचा सलीम (पूर्ण नाव माहिती नाही, रा. कळंबोली, ठाणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल शरद शांताराम खैरे यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून वासुली येथील एमआयडीसी परिसरातील कंपनीत दरोडा टाकण्याचा कट रचला. हा दरोडा टाकण्यासाठी त्यांनी संपूर्ण तयारी केली. चाकण पोलिसांना माहिती मिळाली की, खालूंब्रे गावाजवळ एच पी चौकात मेरीयट हॉटेल समोर काहीजण संशयितरित्या फिरत आहेत. जवळच असलेल्या कंपनीची ते रेकी करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांचा एक साथीदार पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. ताब्यात घेतलेल्या चार जणांकडून घातक शस्त्र, लोखंडी कटावणी, हेक्सा ब्लेड, मिरची पावडर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879df6e18b2060b1',t:'MTcxNDA0NDI0NC4xMDMwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();