Chakan News : गॅस चोरी करणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी केले अटक

एमपीसी न्यूज – एका गॅस सिलेंडर मधून दुसऱ्या गॅस सिलेंडर (Chakan News) मध्ये धोकादायकपणे गॅस काढून चोरी करणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 21) मध्यरात्री तुकाईनगर काळूस येथे करण्यात आली.

तुकाराम लक्ष्मण आढाव (वय 40 , रा. भोसे, ता. खेड), मंथन सुभाष शिंदे (वय 24, रा. रासे, ता. खेड), जयसिंग परशुराम गादेकर (वय 49, रा. भोसे, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रेमकुमार पावडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon News : तळेगावात दोन दिवसीय कॅरम स्पर्धेला सुरुवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधून बेकायदेशीरपणे रिकाम्या गॅस सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढला.(Chakan News) याबाबत माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी छापा मारून कारवाई करत तिघांना अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.