Chakan police instruction : नवरात्र उत्सवासाठी पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना

एमपीसी न्यूज : यंदाचा नवरात्र उत्सव सार्वजनिक मंडळानी शांततेत आणि शासनाने घालून दिलेल्या नियमात आणि वेळेतच साजरा करावा, (Chakan police instruction) मंडळांच्या आवारात कुठलाही अपप्रकार घडू नये यासाठी सर्व नवरात्रोत्सव मंडळानी आपल्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना चाकण पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवरात्रोत्सव कसा साजरा करावा, यासाठी मंडळांना पोलीस प्रशासनाकडून शनिवारी (दि. 24) मंडळाच्या पदाधिकार्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन मंडळांकडून होईल, याची दक्षता घेण्याचे आदेशही पोलिसांकडून देण्यात आले आहेत.(Chakan police instruction) नवरात्रोत्सवाचा पहिल्या; तसेच विसर्जनाच्या दिवशी मिरवणुका, रास दांडियाचे कार्यक्रम यांची परवानगी घेऊनच नियोजन करावे.

Chandani chowk bridge : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; दोन ऑक्टोबरला पाडण्यात येणार चांदणी चौकातील पूल

लोकवर्गणी जमा करताना सक्ती जबरदस्ती करू नये. कुणीही उत्सवाच्या दरम्यान कायद्याचे उल्लंघन करू नये अन्यथा थेट गुन्हे दाखल करू अशा सूचना चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.(Chakan police instruction) यावेळी चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर, कॉंग्रेसचे जमीर काझी, जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते अॅड निलेश कड-पाटील, भाजपचे बाळासाहेब नाणेकर, राष्ट्रवादीच्या संध्या जाधव यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.