Chakan : अवैध दारू भट्टीवर छापा ; चार लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – चाकण जवळ मोई येथे सुरू असलेल्या दारू भट्टीवर छापा टाकून दारू वितरित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन दुचाकी, दारू तयार करण्याचे रसायन, तयार दारू असा एकूण 4 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 19) दुपारी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी केली.

आशा गणपत राठोड (वय 36), निर्मला महेंद्रसिंग राठोड (वय 43, दोघे रा. फलके वस्ती, मोई, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण जवळ मोई येथे नदी किनारी दारुभट्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आशा आणि निर्मला या दोन महिलांना अटक केली. घटनास्थळावरून पोलिसांनी होंडा शाईन मोटारसायकल (एम एच 14 / एफ क्यू 5676), सीडी डीलक्स मोटारसायकल (एम एच 14 / एफ झेड 5508), 25 कॅन हातभट्टी दारू, 2 लाख 85 हजार रुपये किमतीचे दारू बनविण्याचे रसायन, लाकडी सरपण असा एकूण 4 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.