Crime News : चाकण पोलिसांनी 2.43 लाखाचा गुटखा केला जप्त

एमपीसी न्यूज – चाकण (म्हाळुंगे चौकी) पोलिसांनी 2.43 लाख रुपये किंमतीचा गुटखा एका खोलीतून बुधवारी (दि. 17) जप्त केला आहे.

या प्रकरणी ओमजी बिष्णोई, (वय 32, रा. खालुंबरे, ता.खेड, जि.पुणे), अजित पाणमंद, (रा.शिंदेगांव ता.खेड, जि.पुणे) या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना बुधवारी संध्याकाळी 4.10 वा शिंदेगावातील आरोपी अजित पानमंद यांच्या खोलीतून पोत्यामध्ये वेगवेगळ्या कंपनींचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखु विक्रीकरिता साठवणूक केलेला एकूण 2 लाख 43 हजार 343 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला.दोघा आरोपींनी तो माल संगनमताने विक्रीसाठी साठवून ठेवला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.